मुख्यमंत्री एकनथ शिंदे यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज मराठा सांस्कृतिक भवनचे भूमिपूजन...

मराठा भवन बांधण्यासाठी आणखी दहा कोटी निधी देऊ - मुख्यमंत्री शिंदे 

मुख्यमंत्री एकनथ शिंदे यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज मराठा सांस्कृतिक भवनचे भूमिपूजन...

मुख्यमंत्री एकनथ शिंदे यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज मराठा सांस्कृतिक भवनचे भूमिपूजन...

मराठा भवन बांधण्यासाठी आणखी दहा कोटी निधी देऊ - मुख्यमंत्री शिंदे 

पंढरपूर - महाराष्ट्रातील पहिल्या मराठा भवनाचे भूमिपूजन पंढरपूर येथे करण्यात आले यामुळे याचा मला आनंद होत आहे मराठा भवन बांधण्यासाठी पाच कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे आणखी दहा कोटी रुपये देण्यात येतील अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

कार्तिकी यात्रा कालावधीत पंढरपुरात मराठा भवन उभा राहण्यासाठी शासनाने लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात आली होती त्यानुसार शासनाने लक्ष देऊन पंढरपुरात मराठा भवन बांधण्यासाठी पाच कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे.पंढरपूर नगर परिषदेने खादी ग्रामोद्योग परिसरात जागा दिली या जागेवर राजश्री छत्रपती शाहू महाराज मराठा भवनाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले

यावेळी आरोग्य मंत्री तानाजी सावंत खासदार धैर्यशील मोहिते पाटील विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील नागेश भोसले उद्योगपती राजू खरे दीपक वाडदेकर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना राज्यात गोरगरीब नागरिक शेतकरी यांच्यासाठी विविध योजना राबविल्या आहेत यामुळे नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले आहे हे आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लावण्यात आलेला नाही मात्र काही जण विनाकारण न्यायालयात गेले आहेत तरी दहा टक्के आरक्षण टिकविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले पंढरपूर मराठा भवन बांधण्यासाठी शासनाने पाच कोटी रुपये मंजूर केले आहेत मात्र हा निधी कमी पडत असल्याने आणखी दहा कोटी रुपये देण्यात येतील असे त्यांनी सांगितले पंढरपुरात मराठा भावनाचे भूमिपूजन करण्यात आले आहे यामुळे लवकरच भवन उभा राहून अनेकांना सोयी सुविधा मिळणार आहेत