हॉलीबॉल स्पर्धेत मातोश्री गुरुकुल भटुंबरे संघाने मिळवला प्रथम क्रमांक.

हॉलीबॉल स्पर्धेत मातोश्री गुरुकुल भटुंबरे संघाने मिळवला प्रथम क्रमांक.

हॉलीबॉल स्पर्धेत मातोश्री गुरुकुल भटुंबरे संघाने मिळवला प्रथम क्रमांक.

पंढरपूर - पंढरपूर तालुकास्तरीय आंतरशालेय १९ वर्षे वयोगटातील हॉलीबॉल स्पर्धेत मातोश्री सरुबाई माने विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसेच मातोश्री गुरुकुल भटुंबरे या संघाने प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल यश संपादन केलेल्या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 यावेळी पंढरपूर पंचायत समितीचे माजी सभापती व संस्थेचे अध्यक्ष ऍड.वामनराव माने सर, संस्थेचे सचिव - जि.प सदस्य प्राचार्य सुभाषराव माने सर, संस्थेचे संचालक प्रा.विक्रमसिंह माने ,प्राचार्य उत्तमराव कोकरे यांनी अभिनंदन केले.यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना
क्रिडा शिक्षक सुभाष हेगडे सर, अंकुश कारंडे सर, अजयनाना खांडेकर सर यांनी मार्गदर्शन केले.
यासाठी प्रताप शिंदे सर, सुरज लोंढे सर यांनी विशेष परिश्रम घेतले.

पुढील होणाऱ्या जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत मातोश्री गुरुकुल संघाची निवड झाली असून 
या स्पर्धेसाठी संस्थेचे अध्यक्ष शिक्षक व शिक्षक इतर कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.