मुस्लिम तरुणाकडून दिव्यांगांसाठी मेडिकल साहित्य भेट.
वाढदिवसाचा खर्च औषध वाटपावर
मुस्लिम तरुणाकडून दिव्यांगांसाठी मेडिकल साहित्य भेट.
वाढदिवसाचा खर्च औषध वाटपावर
पंढरपूर - पंढरपूर येथील मुजम्मील कमलीवाले या मुस्लिम तरुणाने आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या दिव्यांग भाविकांसाठी मेडिकल साहित्य भेट दिले आहे.
मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्याकडे हे साहित्य सुपूर्द केले. दक्षिण काशी पंढरपूरात राष्ट्रीय एकात्मेचे दर्शन घडले असून मुस्लीम युवकाने आपल्या वाढदिवसावरील खर्च विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या दिव्यांग भक्तांच्या औषधांसाठी करुन समाजापुढेएक आदर्श ठेवला आहे. मुजम्मील कमलीवाले यांचे शहरात मेडिकलचे दुकान आहे.

आपला व्यवसाय सांभाळून ते विविध सामाजिक उपक्रम राबवतात. कोरोना काळात मुजम्मील यांनी स्वतःचा जीव
धोक्यात घालून अनेक कोरोना रुग्णांना मोफत औषधे देवून अनेकांचे प्राण वाचवले होते. याच काळात त्यांनी निराधार व वृध्दांना मोफत अन्नदान सेवा केली होती. पालावरच्या लहान मुलांची दिवाळी गोड व्हावी यासाठीही ते दरवर्षी भटक्या समाजातील लहान मुलांना कपडे व फराळ देवून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम करतात.
याच सामाजिक भावनेतून त्यांनी आपला वाढदिवस साधेपणाने साजरा करुन विठ्ठल दर्शनासाठी येणार्या दिव्यांग भाविकांसाठी दोन वॉकर, शुगर तपासणी मशीन, वजन काटा यासह इतर मोडीकल साहित्य मंदिर समितीला भेट दिले.