मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

पंढरपूरसह जिल्ह्यातील विविध ठिकाणी विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

पंढरपूरसह जिल्ह्यातील विविध ठिकाणी विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

पंढरपूर (प्रतिनिधी) - अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष सिंहगर्जना ग्रुप पंढरपूरचे संस्थापक अध्यक्ष अर्जुनराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये गुरुवार दि. २७ जुलै २०२३ रोजी सकाळी १० वा.रक्तदान शिबिर,मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी प्रमुख पाहूणे युटोपियन शुगरचे चेअरमन उमेश परिचारक, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अर्जुन भोसले, पंढरपूर शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण फुगे,डॉ. मंदार सोनवणे यांच्या उपस्थितीत येथील तांबट धर्मशाळा गांधी रोड येथे कार्यक्रम संपन्न झाला.

तसेच शुक्रवार दि. २८ जुलै २०२३ रोजी सकाळी १०. वा.पंढरपूर तालुक्यातील वाखरी, मगरवाडी, आजोती, अजनसोंड, नेपतगांव, खेडभोसे यांगांवामध्ये खाऊ वाटप व शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यासाठी प्रमुख पाहुणे पंढरपूर शहर पोलीस स्टेशन, ट्रॉफीक स्टाफ यांच्या हस्ते नवरंग बालकाश्रम, नवजीवन निवासी अपंग शाळा, पालवी संस्थान, येथे पंढरपूर होणार आहे.

शनिवार दि. २९ जुलै २०२३ रोजी सकाळी १०.०० वा. मराठा समाजातील युवकांना उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी आण्णासाहेब पाटील आर्थिक मागस विकास महामंडळाचे मोफत रजिस्ट्रेशन (LOI) व प्रोजेक्ट रिपोर्ट या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे चेअरमन विठ्ठल सहकारी साखर कारखाना अभिजीत पाटील, जिल्हा परिषद सदस्य वसंत देशमुख यांच्या हस्ते तांबट धर्मशाळा स्टेशन रोड येथे होणार आहे.

शनिवार दि. २९ जुलै २०२३ रोजी दुपारी १२.०० वा. फराळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून प्रमुख पाहुणे अ.भा.मराठा महासंघ महिला व युवती आघाडी पंढरपूर शहर व तालुका यांच्या हस्ते येथील मातोश्री वृद्धाश्रम,गोपाळपूर ता.पंढरपूर होणार आहे.

शनिवार दि.२९ जुलै २०२३ रोजी सायं.५ वा.अखिल भारतीय मराठा महासंघाच्या शाखांचे उद्घाटन.प्रमुख पाहुणे अ. भा. मराठा महासंघ मंगळवेढा शहर व तालुका ठिकाण शिवप्रेमी चौक-मंगळवेढा, बस स्थानक-मंगळवेढा, बोराळे नाका-मंगळवेढा नागणेवाडी ता. मंगळवेढा, शिरनांदगी ता. मंगळवेढा येथे होणार असून रविवार दि. ३० जुलै २०२३ रोजी सकाळी १०.वा.जिल्हास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा.आमदार प्रशांतराव परिचारक,आ. समाधान आवताडे,धनराज शिंदे,राजेंद्र शेळके, डॉ. संजय देशमुख यांच्या उपस्थितीत तांबट धर्मशाळा, गांधी रोड, पंढरपूर येथे होणार आहे.

रविवार दि.३० जुलै २०२३ रोजी सायं. ०५.०० वा. पारितोषीक वितरण समारंभ व जिल्हास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंढरपूर शहर गुन्हे अन्वेषन विभाग, पंढरपूर शहर (डी.बी.) स्टाफ, सचिन गंगथडे, संतोष जाधव, सचिन रोंगे,सौ. प्रभावती गायकवाड, गुरूदास गुटाळ, सुहास निंबाळकर, अमोल पवार, श्रीनाथ माने, प्रा. रजनीताई जाधव, राहुल यादव,डॉ. संगिताताई पाटील, विक्रम बिस्कीटे (सर), काका यादव, सोमनाथ झेंड,सौ. रतनताई थोरवत, सतिश धनवे (सर), सचिन थिटे, जीवन गायकवाड,सौ.अर्चनाताई चव्हाण, संतोष गंगथडे (सर), पांडुरंग शिंदे, अजित कदम, हणुमंत कदम (सर), गणेश काळे,नितीन जगदाळे, सौ. सुप्रियाताई शिंदे,सौ.ज्योतीताई शिंदे, शिवाजीराव मोरे,नागेश गायकवाड,सुनिल झिरपे,राजू देवकर,यशवंत बागल, सौ. विजयाताई खामकर, सौ. कमलाताई कदम,ॲड. प्राजक्ता शिंदे,सौ. अश्विनीताई साळूंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून तांबट धर्मशाळा, गांधी रोड,पंढरपूर जि. सोलापूर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.