कोल्हापुरात दत्तात्रय सावंत यांच्या प्रचाराचा झंझावात.

मा.आ.दत्तात्रय सावंत यांना पुन्हा आमदार करण्यासाठी शिक्षकांनीच हाती घेतली प्रचाराची धुरा !

कोल्हापुरात दत्तात्रय सावंत यांच्या प्रचाराचा झंझावात.

कोल्हापुरात दत्तात्रय सावंत यांच्या प्रचाराचा झंझावात.

मा.आ.दत्तात्रय सावंत यांना पुन्हा आमदार करण्यासाठी शिक्षकांनीच हाती घेतली प्रचाराची धुरा !

पंढरपूर -  पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा प्रचार रंगात आला आहे.मतदानाला काही दिवस शिल्लक राहिल्याने संपूर्ण मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यातच माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्या प्रचाराचा कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार झंझावात पाहायला मिळत असून, खुद्द शिक्षक बांधवांनीच त्यांच्या प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतल्याचे दिसून येत आहे.

​पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी येत्या २३ ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. २०१४ ते २०२० या काळात या मतदारसंघाचे नेतृत्व केलेले माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्या समर्थनार्थ कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार प्रचार मोहीम राबवली जात आहे.

​आज कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड, शाहूवाडी, हातकणंगले, पन्हाळा, करवीर, कागल, आजरा, शिरोळ, गडहिंग्लज आणि चंदगड या विविध तालुक्यांमधील शेकडो शाळांना शिक्षक व कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी त्यांनी सावंत यांना प्रथम पसंतीचे मतदान करून विजयी करण्याचे आवाहन केले.

​एकतर्फी बलाढ्य राजकीय पक्षांचे बळ पाठीशी नसले, तरी पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात दत्तात्रय सावंत यांच्या पाठीशी शिक्षक चळवळीचे मोठे जाळे आणि निष्ठावान कार्यकर्त्यांची फळी उभी आहे. याच शिक्षक चळवळीच्या आणि कार्यकर्त्यांच्या बळावर सावंत यांनी संपूर्ण मतदारसंघात अत्यंत सक्षम आणि प्रभावी प्रचार यंत्रणा राबवली असून, यामुळे या निवडणुकीची रंगत वाढली आहे.