सरकोली येथे जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन : ८० जणांची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड
८० जणांची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड ; आ.समाधान आवताडे,आ.राजू खरे ,आ.अभिजीत पाटील यांची उपस्थित
सरकोली येथे जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन : ८० जणांची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड
पंढरपूर - सरकोली येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेतून ८० मल्लांची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय, सोलापूर आणि श्री भैरवनाथ विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, सरकोली यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. १४, १७ व १९ वर्षांखालील मुलांच्या फ्रीस्टाईल गटातील सामने घेण्यात आले. विविध आठ गटांत झालेल्या स्पर्धेत सुमारे ८०० कुस्तीपटूंनी सहभाग घेतला.

स्पर्धेत आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू हनुमंत जाधव याने ४५ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळविला.यावेळी संयोजक दत्तात्रय भोसले यांच्या पुढाकाराने ५१ हजार रुपयांची मानाची कुस्ती अभिजीत भोसले व रेवन शिंदे यांच्यात झाली. त्यात अभिजीत भोसले विजयी झाला.

स्पर्धेच्या दरम्यान आमदार राजू खरे, आमदार अभिजीत पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी दत्तात्रयं वरकड, संयोजक दत्तात्रय भोसले, सुनील भोसले, दीपक भोसले, प्रवीण भोसले, सरपंच शिवाजी भोसले, मोहन यादव, मच्छिंद्र सपाटे, प्रशांत बाबर, नितीन भोसले, प्राचार्य धनपाल हाबळे उपस्थित होते.
सूत्रसंचालन धनाजी मदने यांनी केले.आभार समाधान भोसले याने मानले.