मोहोळचे माजी आमदार यशवंत माने यांच्या निधीतून 14 कोटी रुपयांच्या 10 किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण

मोहोळचे माजी आमदार यशवंत माने यांच्या निधीतून 14 कोटी रुपयांच्या 10 किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण

मोहोळचे माजी आमदार यशवंत माने यांच्या निधीतून 14 कोटी रुपयांच्या 10 किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण

पंढरपूर - मोहोळ मतदार संघाचे माजी आमदार यशवंत माने यांच्या निधीतून चळे तालुका पंढरपूर येथे तब्बल 14 कोटी रुपयांच्या निधीतून तब्बल दहा किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. गावाच्या इतिहासात पहिल्यांदाच सलग दहा किलोमीटर रस्त्यांचे काम पूर्ण झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

चळे येथील सर्वच रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली होती. त्यावेळी लोकप्रतिनिधी म्हणून मतदारसंघाचे नेतृत्व करत असताना आमदार यशवंत माने यांच्याकडे ग्रामस्थांनी व स्थानिक नेतृत्वाने यशवंत माने यांच्याकडे रस्तेसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. तेव्हा आमदार यशवंत माने यांनी नागरिकांना आश्वस्त करत या रस्त्यासाठी ठोस निधी देण्याचे आश्वासन दिले होते.

त्यानुसार चळे ते बर्ड वस्ती या पाच किलोमीटरच्या रस्त्यासाठी मुख्यमंत्री सडक योजनेतून तब्बल 4 कोटी 27 लाख रूपयांचा रस्ता करून शिवारातील रस्ता हा डांबरीकरण करण्यात आला असून या रस्त्यावरून आता शालेय विद्यार्थ्यासाठी बस सेवा ही सुरू झाले आहे.

5 कि.मी. आंवे 12 कि.मी. दलिंग मंदिर 7 कि.मी. तसेच चळेपटी या तालुक्याला जोडणाऱ्या रस्त्यासाठी ही आमदार यशवंत माने यांच्या निधीतून तब्बल नऊ कोटी रूपयांचा निधी मंजूर करून देण्यात आला होता व त्या निधून पाच किलोमीटर रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरणांचे काम पूर्ण झाले असून हा रस्ता आता वाहतुकीसाठी सुरू आहे.

मात्र नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूक मध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र पराभवाची कोणतीही सल मनामध्ये न ठेवता त्यांनी स्थानिक लोकांचे प्रश्न सोडवणे व स्थानिक नागरिकांच्या मतदारांच्या संपर्कात राहत असून त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभाल होत असल्याचे चित्र मोहोळ मतदार संघामधून दिसून येत आहे.

या रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने या रस्त्यावरून महामंडळांची बस सेवा सुरू झाली. विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रश्र ही निकालात निघाल्याने शिक्षणांचा मार्ग मोकळा झाला असून नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

रस्ते विकासाचे ठळक मुद्दे

एकूण निधी : 14 कोटी रूपये

एकूण लांबी : 10 किलोमीटर

चळे ते बर्ड वस्ती : 5 कि.मी. (4 कोटी 27 लाख)

चळेपटीतळे जोड रस्ता : 5 कि.मी. (9 कोटी)

कामाचा प्रकार : डांबरीकरण व सिमेंट काँक्रिटीकरण

सधास्थिती : वाहतुकीसाठी पूर्णतः खुला

नवीन सुविधा : महामंडळ बस सेवा सुरू, विद्यार्थ्यांना दिलासा

गावाच्या इतिहासात पहिल्यांदाच सलग दहा किलोमीटर रस्त्यांचे काम पूर्ण झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. 2019 ते 2024 या पंचवार्षिक कालावधीताल मोहोळ मतदार संघाचे नेतृत्व माजी आमदार यशवंत माने यांनी केले होते.तेंव्हा त्यांनी स्थानिक प्रश्न सोडविण्यावरती भर दिला होता.