जिल्ह्यात ३३२ शिक्षकांना जागेवर नियुक्ती आदेश देऊन सेवा संकल्प अभियानाची सुरुवात
राज्यात सोलापूर जिल्हा परिषदेचा आदर्श ; स्वच्छता ही सेवा २०२६ अभियानास प्रारंभ
जिल्ह्यात ३३२ शिक्षकांना जागेवर नियुक्ती आदेश देऊन सेवा संकल्प अभियानाची सुरुवात
राज्यात सोलापूर जिल्हा परिषदेचा आदर्श ; स्वच्छता ही सेवा २०२६ अभियानास प्रारंभ
सोलापूर - जिल्ह्यात ३३२ शिक्षकांना जागेवर नियुक्ती आदेश देऊन सेवा संकल्प अभियानाची सुरुवात करीत सोलापूर जिल्हा परिषदेने राज्यात आदर्श निर्माण केला आहे.
यशवंतराव चव्हाण सभागृहात आज सेवा संकल्प अभियानाचे आयोजन करणेत आले होते. या अभियानाचा शुभारंभ नूतन ३३२ शिक्षकांना जागेवर समुपदेशनाने नियुक्ती देऊन सुरुवात केली.

सामान्य प्रशासन विभागाने आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकिर्दीला २५ वर्षे पुर्ण झाले बद्दल सेवा संकल्प अभियानाचे आयोजन करणेत आले होते. शिक्षण विभागात प्रातिनिधिक स्वरूपात पंढरपूर तालुक्यातील सिध्देवाडी येथील पांडुरंग ज्ञानेश्वर शिंदे व आदिती चव्हाण या उमेदवारास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचे हस्ते नियुक्ती आदेश देऊन सेवा संकल्प अभियानाचा शुभारंभ करणेत आला.
या साठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, शिक्षण व आरोग्य समितीचं सभापती चेतनसिंह केदार, महिला व बाल कल्याण विभागाचे सभापती अमृता वाघे, कृषी व पशु संवर्धन विभागाचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, ग्रामीण विकास यंत्रणा विभागाचे प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ प्रमुख उपस्थित होते.

सामान्य प्रशासन विभागाने गटविकास अधिकारी यांची विशेष बैठक घेऊन सोलापूर जिल्ह्यात या सेवा संकल्प अभियानाचे विशेष नियोजन केले आहे.
प्रास्तविक उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ यांनी केले.. शिक्षणाधिकारी विशाल मुळे व त्यांचे टीमने समुपदेशन घेऊन पारदर्शी पध्दतीने ही नियुक्ती देणेत येत असल्याचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ यांनी सांगितले. प्रारंभी समाज कल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांनी समाजकल्याण विभाग व महिला व बाल कलियाण विभागाचे नियोजन सांगितले.

तसेच माध्यमिक शिक्षणाधिरी सचिन जगताप, जिल्हा कृषी अधिकारी हरिदास हावळे, जिल्हा आरोग्य अधिकारी सतीश केोपुरवाड, यांनी आपापल्या विभागाचे संकल्प सेवा अभियानातील उपक्रमाचे नियोजन सांगितले. सुत्रसंचालन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी केले.उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकंत भुजबळ यांनी आभार मानले.