इसबावी उपनगरातील विसावा मंदिर ते मलपे ओढा पालखी मार्गावरील ३५० मि.मी.ड्रेनेज लाईन कामास प्रारंभ

इसबावी उपनगरातील विसावा मंदिर ते मलपे ओढा पालखी मार्गावरील ३५० मि.मी.ड्रेनेज लाईन कामास प्रारंभ

इसबावी उपनगरातील विसावा मंदिर ते मलपे ओढा पालखी मार्गावरील ३५० मि.मी.ड्रेनेज लाईन कामास प्रारंभ

पंढरपूर : इसबावी उपनगरातील विसावा मंदिर ते मलपे ओढा या पालखी मार्गावरील ३५० मि.मी. ड्रेनेज लाईन कामाची सुरुवात मा. गणेशभाऊ अधटराव यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून करण्यात आली.

यावेळी नगरसेवक बालाजी अरुण मलपे, नगरसेविका अनिता सिकंदर ढवळे, नगरसेवक विशाल दगडू मलपे, नगरसेविका निता नितीन परचंडे, तसेच अरुण सालविठ्ठल, सिकंदर ढवळे सर, सूर्यकांत पवार, दिलीप कांबळे, शामराव अधटराव, नाना भोसले, आबा झेंड, प्रकाश मगर, समीर शेख व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साबळे नगर येथील पंपहाऊसमधून ड्रेनेज पाण्याचा उपसा करून ते विसावा मंदिराच्या दक्षिणेकडील परिसरात सोडले जात असल्याने त्या भागातील नागरिकांना अनेक वर्षांपासून दुर्गंधी, अस्वच्छता व विविध गैरसोयींना सामोरे जावे लागत होते. नव्याने सुरू करण्यात आलेल्या या ३५० मि.मी. ड्रेनेज लाईनमुळे या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघण्यास मदत होणार असून परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

तसेच विसावा मंदिर ते मलपे ओढा या पालखी मार्गावरील नव्याने उभारण्यात आलेल्या व्यवसायिक इमारती, शोरूम, हॉटेल तसेच इतर व्यावसायिक आस्थापनांना या ड्रेनेज लाईनची जोडणी घेता येणार असल्याने या परिसरातील नागरी सुविधा अधिक सक्षम होऊन स्वच्छता व विकासाला चालना मिळणार आहे.

कार्यक्रमाच्या शेवटी नगरसेवक बालाजी अरुण मलपे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानून संबंधित ठेकेदारास काम उच्च दर्जाचे व टिकाऊ स्वरूपात करण्याच्या सूचना दिल्या.