सोलापूर लोकसभेसाठी जयश्रीताई खरात यांच्या नावाची चर्चा
संधी मिळाल्यास सोलापूर लोकसभेची निवडणूक लढवणार - जयश्रीताई खरात
सोलापूर लोकसभेसाठी जयश्रीताई खरात यांच्या नावाची चर्चा
संधी मिळाल्यास सोलापूर लोकसभेची निवडणूक लढवणार - जयश्रीताई खरात
पंढरपूर - लोकसभा निवडणुक काही दिवसातच जाहीर होण्याची शक्यता असल्याने सर्वच राजकीय पक्षात निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले उमेदवारांचे मतदारसंघामध्ये दौरे करत वाढत आहे,बैठका घेत असून ते कामाला लागले आहेत. तसेच राजकीत पक्षांकडूनही उमेदवारांची चाचपणी करण्यात येत आहे.

त्यामुळे कोणत्या लोकसभा मतदार संघातून कोणता पक्ष कोणाला उमेदवारी देणार? यांकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. अशातच आता सोलापूर राखीव लोकसभेसाठी भाजपाच्या माजी नगरसेविका मुंबई भाजपा सचिव जयश्री खरात यांच्या नावाची चर्चा पंढरपूर- मंगळवेढा मतदार संघातील नागरिकांतून होत आहे.
स्थानिक उमेदवार असल्याने मतदारसंघातील नागरिकांकडून जयश्रीताई खरात यांच्या नावाला पसंती मिळत असल्याचे दिसून येत आहे.
पंढरपुरात पत्रकारांशी बोलताना माजी नगरसेविका जयश्रीताई खरात म्हणाल्या की,सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपा पक्षाने जर मला संधी दिली तर मी निवडणूक लढण्यास तयार आहे. मी स्थायिक पंढरपूर येथील रहिवासी असून मी चेंबूर येथे माजी नगरसेविका व पक्षाच्या विविध पदांवर काम केले आहे. सोलापूर लोकसभेसाठी पक्षाच्या वतीने जो आदेश देईल किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी,अमित भाई शहा, जे पी नड्डा ,देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, चंद्रकांत बावनकुळे यांनी मला आशीर्वाद दिल्यास निवडणुक लढवणार असून मतदारसंघातील विविध रखडलेले प्रकल्प,कामे पुर्ण करणार असल्याचे सांगितले.

सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून माजी खासदार अमर साबळे, प्रा.चांगदेव कांबळे, आ.राम सातपुते,उत्तम जानकर यांची नांवे चर्चेत आहेत.मात्र मूळच्या पंढरपूर येथील आसणाऱ्या जयश्रीताई खरात यांच्या नावाची देखील मतदार संघातील नागरिकांतून चर्चा होताना दिसत आहे.
सोलापूर मतदारसंघात कोणाला उमेदवारी द्यावयाची या बाबत भाजपने अद्याप निर्णय घेतला नाही. भाजपकडून उमेदवारांची नावे गुलदस्त्यात ठेवली आहेत. यामुळे सोलापूर लोकसभेची उमेदवारी कोणाला मिळणार की महिला उमेदवार म्हणून जयश्रीताई खरात यांना संधी देणार याकडे सोलापूर मतदारसंघातील मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे.