आषाढी वारीत वारकऱ्यांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खा.श्रीकांत शिंदे यांच्या वतीने साड्या,छत्र्या व पिशव्यांचे वाटप

आषाढी वारीत वारकऱ्यांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खा.श्रीकांत शिंदे यांच्या वतीने साड्या,छत्र्या व पिशव्यांचे वाटप

आषाढी वारीत वारकऱ्यांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खा.श्रीकांत शिंदे यांच्या वतीने साड्या,छत्र्या व पिशव्यांचे वाटप

पंढरपूर - आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर येथे अवघा महाराष्ट्र विठ्ठलमय झाला असून, संपूर्ण राज्यातून लाखो वारकरी व भक्तगण माऊलींच्या भेटीसाठी पंढरीत दाखल झाले आहेत. या सोहळ्यात आलेल्या भाविकांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्याचे लाडके नेते व कर्तव्यदक्ष नेतृत्व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच मा.खा.श्रीकांतजी शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली विविध सेवा उपक्रमांचे आयोजन करून भव्य 'संत पूजन सोहळा' पार पडला.

माऊलींचा सन्मान आणि साहित्य वाटप या सोहळ्यात आषाढी वारीसाठी आलेल्या वारकऱ्यांसाठी भरभरून मदत व सेवा देण्यात आली.

माऊलींचा साडी देऊन सन्मान - डोक्यावर तुळशीवृंदावन घेऊन पायी चालणाऱ्या प्रत्येक वारकरी महिला माऊलीला मा. शिंदे साहेबांकडून आलेली साडी देऊन भावुक वातावरणात सत्कार करण्यात आला.

विणेकरी व दिंडी सन्मान - वारीतील विणेकऱ्यांना सन्मानपूर्वक टॉवेल व पिशव्या, तर प्रत्येक दिंडीला आवश्यक पिशव्यांचे (बॅग्ज) वाटप करण्यात आले.

छत्री व रेनकोट वाटप - वारीतील पाऊस-पाण्यापासून भक्तांचे रक्षण व्हावे यासाठी मा. शिंदे साहेबांच्या वतीने छत्र्या व रेनकोटचे वाटप करण्यात आले.

आरोग्य शिबिर व फराळ - भाविकांच्या सोयीसाठी मोफत फराळ वाटप आणि वैद्यकीय उपचारांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.

प्रमुख उपस्थिती व स्वागत - हा संपूर्ण सेवा सोहळा अध्यात्मिक धर्मवीर वारकरी प्रचार व प्रसार करणारे अक्षय भोसले महाराज यांनी स्वतः उपस्थित राहून पार पाडला. पंढरपुरात येणाऱ्या प्रत्येक माऊलीचे आणि वारकऱ्यांचे स्वागत अक्षय भोसले महाराज यांनी स्वतःच्या हाताने तुळशी व साडी देऊन केले.

या उपक्रमासाठी वैद्यकीय शिवसैनिक ओंकार बसवंती आणि शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ.आरती बसवंती यांनी विशेष पुढाकार घेऊन सर्व व्यवस्था चोख बजावली.

वारकऱ्यांना मिळालेल्या या मायेच्या निवाऱ्यामुळे आणि सन्मानामुळे राज्यभरातून आलेल्या भाविकांनी शिंदे साहेब आणि आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.