पंढरीतील समस्या दूर करण्यासाठी मनसेचे नेते दिलीपबापू धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन
पंढरीतील समस्या दूर करण्यासाठी मनसेचे नेते दिलीपबापू धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन
पंढरपूर - महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथरावजी शिंदे साहेब आज पंढरपूर दौऱ्यावर आले असता, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
आषाढी वारीच्या काळात लाखो वारकरी भक्त पंढरपूरमध्ये दाखल होतात. त्यांची आरोग्यविषयक व इतर सर्व सोयींची व्यवस्था करणे हे शासनाचे कर्तव्य आहे. यासाठी शासनाने तातडीने आर्थिक व प्रशासकीय मदत करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

तसेच पंढरपूर शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, वाहतूक व इतर विविध प्रलंबित समस्या त्वरित सोडवण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना द्यावेत, अशी विनंतीही उपमुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली.
यावेळी माजी आरोग्यमंत्री आ. प्रा. तानाजीराव सावंत, आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर, गृहराज्यमंत्री योगेश कदम, भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल दादा सावंत, गटनेते व नगरसेवक नागेश भोसले, संजय बंदपट्टे, ओंकार जोशी, किरणराज गाडगे, प्रसाद कळसे, अक्षय गंगेकर, मनसेचे शहर संघटक गणेश पिंपळनेरकर, समाजसेवक बाबा चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.