शिवरत्न पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मधील नविन शैक्षणिक वर्षाच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

शिवरत्न पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मधील नविन शैक्षणिक वर्षाच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

शिवरत्न पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मधील नविन शैक्षणिक वर्षाच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

पंढरपूर,गादेगाव - शिवरत्न पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज गादेगाव मधील शैक्षणिक वर्ष 2026 27 शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

शिवरत्न पब्लिक स्कूल मधील विद्यार्थ्यांची शाळेच्या वतीने मोठ्या उत्साहामध्ये विद्यार्थ्यांनचे वाजत गाजत व पुष्पष्टी करून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस अत्यंत आनंदाचा आणि उत्साहाचा जावा यासाठी विद्यार्थ्यांना विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांची लगबग सुरू असल्याचे दिसत होते. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती मोठा उत्साह आणि आनंद दिसून येत होता दरवर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे वाचत गाजत मोठ्या उत्साहामध्ये शिवरत्न पब्लिक स्कूलमध्ये स्वागत केले जाते. लहान चिमुकल्यांचा आनंद द्विगुणित करण्याचं काम शिवरत्न पब्लिक स्कूलच्या वतीने करण्यात आले.

यावेळी संस्थापक अध्यक्ष गणपत मोरे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थापक सचिव वर्षा मोरे, सहशिक्षक नियाज मुलाणी, शितल बागल कविता कांबळे लीना बागल वैभव माने प्रवीण माने, माहकू खांडेकर, राहुल काळे, शाईन शेख, तेजश्री गव्हाणे, फर्जना पटेल, श्रुतिका बागल, सोनाली नागणे, सदाशिव इंगोले, विजय कोळी, अजय मोरे,बंडू कलागते. आधी शिक्षक वर्ग उपस्थित होते.

सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले व शुभेच्छा दिल्या या शैक्षणिक वर्षांमध्ये कशा पद्धतीने शैक्षणिक कामकाज चालणार आहे.याविषयी माहिती संस्थापक अध्यक्ष गणपत मोरे यांनी दिली विद्यार्थ्यांनी शिस्त व अभ्यास नियमित करावा या संदर्भात वर्षा मोरे यांनी मार्गदर्शन केले.