गोपाळपूर येथे काल्यासाठी आलेल्या भाविकांना भाजपा तालुकाध्यक्ष सुभाष मस्के यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप
गोपाळपूर येथे काल्यासाठी आलेल्या भाविकांना भाजपा तालुकाध्यक्ष सुभाष मस्के यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप

पंढरपूर - शेकडो वर्षाच्या परंपरेनुसार आषाढी यात्रेची सांगता गोपाळपूर येथील गोपाळ काल्याने होते. गुरुवारी गुरु पौर्णिमेच्या मुहूर्तावर आलेल्या गोपाळकाल्यासाठी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत निवृत्तीनाथ, संत सोपानकाका, संत मुक्ताई, संत एकनाथ, संत नामदेव, संत गजानन महाराज यांच्यासह प्रमुख संतांच्या पालख्या आणि दिंड्या हरिनामाचा गजर करत गोपाळपूर नगरीत सोमवारी पहाटेपासूनच दाखल होत होत्या.

गोपाळकाल्यानिमित्त गोपाळपुरात आलेल्या सर्व भाविकांना पंढरपूर भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष प्रा.सुभाष मस्के यांच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्याचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी ज्येष्ठ नेते दिलीप गुरव, प्रसिद्ध भारुडकार चंदाताई तिवाडी, सरपंच, उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व सर्व सदस्य तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.