प्रहार अपंग क्रांती संघटनेचा पंढरपुरात मेळावा संपन्न.
दिव्यांगांचे प्रश्न तडीस लागेपर्यंत प्रयत्न करणार - आमदार बच्चू कडू
दिव्यांगांचे प्रश्न तडीस लागेपर्यंत प्रयत्न करणार - आमदार बच्चू कडू
प्रहार अपंग क्रांती संघटनेचा पंढरपुरात मेळावा संपन्न.
पंढरपूर - प्रहार अपंग क्रांती संघटनेचा पंढरपुरात शुक्रवारी मेळावा संपन्न झाला.राज्य सरकारने दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र मंत्रालय करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यातील पहिलाच दिव्यांग बांधवांचा मेळावा पंढरपुरात संपन्न झाला.यावेळी प्रहार सैनिक व सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश दिव्यांग बांधव उपस्थित होते.

यावेळी प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू म्हणाले की दिव्यांग बांधवांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालयाची मागणी केल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत दिव्यांग बांधवांच्या स्वतंत्र मंत्रालयाचा प्रश्न मार्गी लागला असल्याने शिंदे सरकारचे आभार मानले.
पुढील काळात दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र विद्यापीठ, स्वतंत्र क्रीडा संकुल याचबरोबर विविध प्रश्नाबाबत प्रयत्न करणार असल्याचे आमदार बच्चू कडू यांनी सांगितले.
याचबरोबर दिव्यांगांनी आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी उद्योगधंदे वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. याचबरोबर बचत गटाची निर्मिती केली पहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.दिव्यांग बांधवांना विश्वासात घेतल्याशिवाय लोकप्रतिनिधीही निवडून येऊ शकत नाही अशी ओळख झाली असल्याचे यावेळी आमदार बच्चू कडू यांनी सांगितले.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख रामदास खोत, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव, जिल्हा महिला अध्यक्ष संजीवनी बारंगुळे, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय चौगुले, विजय पुरी, जिल्हा सचिव संजय जगताप, तालुका अध्यक्ष उमेश गोडसे, शहराध्यक्ष गणेश ननावरे, महिला जिल्हा उपाध्यक्ष अंबुताई गुजले, संपर्क प्रमुख हनुमंत चव्हाण, तालुका उपाध्यक्ष दत्ता जमदाडे, सरिता माने, सुनीता लावंड, वैशाली गुरव, हनुमंत आरकेले,मुंडेवाडी शाखाध्यक्ष राहुल सुतार, सोलापूर जिल्हा संघटक रवी भाऊ गायकवाड, सुमनताई गायकवाड, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सिद्धराया माळी, समाधान हेंबाडे
यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुकाप्रमुख व प्रहार सैनिक उपस्थित होते.