मनसेच्या प्रयत्नाला यश... नगरपरिषदेने केलेली करवाढ शासनाने दिली स्थगिती
मोर्चाद्वारे दिलीप धोत्रे यांनी दिले होते नागरिकांना आश्वासन
मनसेच्या प्रयत्नाला यश... नगरपरिषदेने केलेली करवाढ शासनाने दिली स्थगिती
मोर्चाद्वारे दिलीप धोत्रे यांनी दिले होते नागरिकांना आश्वासन
पंढरपूर - पंढरपूर शहरातील नागरिकांच्या विविध समस्येबाबत मनसे नेते दिलीप धोत्रे कायम आक्रमक होत असतात.अश्यातच नगरपालिकेने सुविधा न देताच केवळ करवाढ करण्याचा घाट घातला होता.याबाबत ही करवाढ रद्द करून दाखविण्यासाठी पुढाकार घेऊन या करवाढीला शासनाकडून स्थगिती मिळाली आहे.

पंढरपुर नगर पालिकेने चतुर्थ वार्षिक कर निर्धारणाच्या नावाखाली शहरातीद मालमत्ता धारकांवर करवाढीचा मोठा बोजा टाकण्याचा निर्णय घेतला होता.शहरातील अनेक मालमत्ता धारकांना १५ टक्के ते ८० टक्के पर्यंत करवाढीचा नोटीस देण्यात आल्या होत्या.तर हरकती दाखल करण्यासाठी देखील अगदी कमी कालावधी दिला होता.एकीकडे शहरात नगरपालिका प्रशासन व माजी सत्ताधारी शहरातील नागरिकांना अगदी मूलभूत सुविधा देण्यात,स्वछ आणि पुरेसा पिण्याचा पाणी पुरवठा करण्यास अपयशी ठरलेले असताना, शहरातील बागा कुलूपबंद असताना, रस्ते धुळीने माखलेले असताना,अनेक ठिकाणी ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर,अतिक्रमण करून व्यापलेले फुटपाथ अशी परिस्थिती असताना हि करवाढ केली जाणार होती.यामुळे नागरीकातून प्रचंड संताप व्यक्त होऊ लागला होता.
याबाबत विविध पक्ष संघटना यांनी मोर्चे आंदोलने केली, तर मनसेने पंढरपुर नगर पालिकेवर प्रचंड मोठा मोर्चा काढण्याबरोबरच थेट मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी सरकारकडे धाव घेतली. याबाबत शासन स्तरावर राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दाद मागितली होती.त्यावेळी मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या पत्रावर दिनांक १८ डिसेंबर 2023रोजी अंतरिम स्थगितीचा आदेश नगर पालिकेने काढला होता. यानंतर अखेर दिनांक ७ फेब्रुवारी रोजी नगर विकास विभागाने पंढरपूर नगर पालिकेस पत्र देत सदर करवाढ करण्यावर स्थगिती आदेश काढण्यात आला.

या आदेशावर मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या हरकतीचा संदर्भ देत स्थगित करीत असल्याचे म्हटले आहे.त्यामुळे दिलीप धोत्रे यांचा पाठपुरावा अखेर यशस्वी ठरला . हे मात्र नक्की झाले आहे.
चौकट
सक्षम विरोधकाच्या भूमिकेत दिलीपबापू धोत्रे
नगरपालिका प्रशासन मनमानी कारभार करण्यात पटाईत आहे. याकडे सत्ताधारी मंडळी नेहमीच दुर्लक्ष करीत असल्याचे येथील नागरिकांनी पाहिले आहे. मात्र पंढरीतील नागरिकांना विविध प्रश्नासंदर्भात न्याय देण्यासाठी सक्षम भूमिका पार पाडण्यासाठी दिलीप धोत्रे यांनीच पुढाकार घेतल्याचे पाहिले आहे. त्यातून अनेकवेळा अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. यामुळेच दिलीपबापूना सक्षम विरोधकांची भूमिका पार पाडावी लागत आहे. त्याचा आगामी राजकारणात नक्की फायदा मिळेल हे मात्र नक्की आहे.